बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका किराणा दुकानदाराच्या मुलीने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळाला आहे. सहना महांतेश रायर असे या मुलीचे नांव असून तिने परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
राज्यभरातील एसएसएलसी अर्थात दहावीचा निकाल आज गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यावेळी राज्यभरातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळविले आहेत.
त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील सहना महांतेश रायर या विद्यार्थिनीने सर्वाधिक गुणवत्ता सिद्ध करताना राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सहना ही सौंदत्ती येथील कर्नाटक पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून तिने दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 625 गुण संपादन करताना स्वतः आपले गाव आणि जिल्ह्याचे नांव उज्वल केले आहे राणी तिच्या वडीलांचे किराणा मालाचे दुकान आहे.
आपली मुलगी राज्यात प्रथम आल्याबद्दल रायर दाम्पत्याने गावात मिठाईचे वाटप करून अत्यानंद व्यक्त केला. उपरोक्त यशाबद्दल सहना महांतेश रायर हिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.