Wednesday, January 15, 2025

/

यश ऑटोमध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात

 belgaum

बेळगाव शहरातील यश ऑटोचे संचालक  शिवसंत संजय मोरे यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे पारंपारिक पद्धतीने आयोजित शिवजयंती अर्थात शिवजन्मोत्सव सोहळा सोमवारी सायंकाळी शिवमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.

यश ऑटोच्या गणेशपूर येथील वर्कशॉपच्या ठिकाणी या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसंत संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून राजेंद्र मुतगेकर आणि सहशिक्षक रणजीत चौगुले यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक महादेव चौगुले, रायगडचे वारकरी के. एन. पाटील गुरुजी व अरुण मोरे उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापिका विद्या पाटील यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छ. शिवाजी महाराजांच्या मुर्ती पूजनाचा कार्यक्रम झाला.Yash auto

यावेळी बोलताना प्रमुख वक्ते राजेंद्र मुतगेकर यांनी शिवरायांच्या पराक्रमाची माहिती देऊन मराठ्यांच्या धाडसी, निस्वार्थी आणि विश्वासू स्वभावाचा गैरफायदा राजकारणी आणि स्वार्थी लोक घेत आहेत. त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे.

मराठी तरुणांनी स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आणि व्यवसायात उतरणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन केले. सहशिक्षक रणजीत चौगुले यांनी रयतेचा राजा शिवछत्रपती या विषयावर उद्बोधक विचार व्यक्त केले. महादेव चौगुले यांनी यावेळी बोलताना धाडसी माणसाला दैव कायम साथ देते हे लक्षात घेतले पाहिजे. तेंव्हा मराठी तरुणांनी विधायक कार्य तडीस नेण्यासाठी साम, दाम, दंड याचा वापर करावा. तसेच प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने व धाडसाने प्रगती साधावी, असे सांगितले.

सदर कार्यक्रमास उद्योजक अजित यादव, दत्ता कानूरकर, एम. वाय. घाडी, नारायण कणबरकर, राहुल मोरे, प्रा. रमेश भोसले, शंकर मोरे, डी. बी. पाटील, रवी धुराजी, संजय गुरव, धनाजी मोरे, नागेश ढेगसकर, सौ. मुतगेकर, प्रतिभा घाडी, सुषमा मोरे, राधिका तरळे, येसूबाई घाडी आदींसह निमंत्रित पाहुणे, यश ऑटोचा कर्मचारी वर्ग, गणेशपुर परिसरातील शिवप्रेमी बंधू-भगिनी आणि बहुसंख्य महिलावर्ग उपस्थित होता.

शेवटी दत्ता उघाडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी गणेश उसुलकर यांनी उभारलेली किल्ल्याची भव्य प्रतिकृती सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.