बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 2022 -23 सालच्या व्यवस्थापकीय समितीचा अधिकारग्रहण सोहळा येत्या शुक्रवार दि. 13 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट नजीक असलेल्या हॉटेल संतोरिनी येथे येत्या शुक्रवारी सायंकाळी 8:30 वाजता हा अधिकार ग्रहण सोहळा होणार आहे. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन बेंगलोरचे अध्यक्ष एस. नंजुंडा प्रसाद हे उपस्थित राहणार आहेत.
याव्यतिरिक्त सन्माननीय अतिथी म्हणून आयकर खात्याचे बेळगावचे आयुक्त बसवराज नलगावी, संयुक्त आयुक्त राजेश्वरी मेनन, संयुक्त आयुक्त यास्मिन बेगम वालीकर आणि संयुक्त आयुक्त रानेश्वर मेघन्नावर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमात जितेश कब्बूर, महांतेश दडीगुंडी, भरतेश मुरगुंडे, तोरप्पा मालगे, विक्रम कोकणे, शीतल देवकी, संजीव बडगंडी, होळेबसाप्पा हनगंडी, प्रवीण मुंगरवाडी, मृत्युंजय बोरमळ, रमेश परदेशी, संजय केस्ती, महांतेश मुदनूर, प्रदीप कुलकर्णी, योगेश अंगडी, प्रशांत अवरस, शशिधर पाटील, अनिल कुंदप व बालचंद्र गौडर हे पदाधिकारी आपल्या अधिकाराची शपथ ग्रहण करणार आहेत.
तरी बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या सर्व सभासदांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष जितेश कब्बूर यांनी केले आहे.