सध्याची महागाई जीवनावश्यक साहित्यासह गॅस व इंधनाचे वाढलेले दर लक्षात घेऊन गरीब गरजूंच्या सोयीसाठी जळाऊ लाकूड ‘ना नफा -ना तोटा’ तत्त्वावर विक्री करण्याचा उपक्रम शहरातील वन टच फाउंडेशनतर्फे राबविला जात आहे.
सध्या महागाईचा भस्मासुर फोफावत चालला आहे. घरगुती साहित्य, गॅस, इंधन आदींचे दर गगनाला भिडले आहेत. या सर्व बाबींची विचार करून, नेहमीच गरीब जनतेच्या हितासाठी
कार्य करणाऱ्या बेळगावात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ‘वन टच फाऊंडेशन’ या संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांनी आपल्या ऑटोनगर येथील विठ्ठल फर्निचर वर्क्स या शोरूममधील लाकडी कापीव जळावू लाकूड फक्त 2 ते 2.50 रुपये प्रती किलो या दरात म्हणजे ‘ना नफा -ना तोटा’ तत्त्वावर विक्रीस उपलब्ध केले आहे. बाजारात हा दर 4 ते 5 रुपये प्रति किलो आहे.
तेंव्हा गरीब गरजू कुटुंब किंवा व्यक्तींनी ऑटोनगर येथील विठ्ठल फर्निचर वर्क्स येथून जळाऊ लाकूड घेऊन जावे तसेच अधिक माहितीसाठी 8884640133 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विठ्ठल पाटील यांनी केले आहे.