खानापूर तालुक्यातील लिंगणमठ गावात विश्वगुरू श्री बसवेश्वर यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे ग्रामस्थांसह सोबतच मुस्लिम बांधवांनी देखील उत्स्फूर्त स्वागत केले.
खानापूर तालुक्यातील लिंगणमठ गावात विश्वगुरू श्री बसवेश्वर यांच्या या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठापने पूर्वी या मूर्तीची गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी ग्रामस्थांसमवेत गावातील मुस्लिम बांधवांनी देखील या मिरवणुकीचे उस्फुर्त स्वागत केले. श्री बसवेश्वर मूर्तीची मिरवणूक गावातील मशिदीसमोर येताच लिंगणमठ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आणि स्थानिक मुस्लिम युवा नेता कासिम हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज बांधवांनी श्री बसवेश्वर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्याचप्रमाणे विश्वगुरु श्री बसवेश्वर महाराज की जय! अशा घोषणाही दिल्या. याप्रसंगी गावातील मुस्लिम समुदाय बहुसंख्येने उपस्थित होता.