महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेण्यासाठी शहर समिती किंवा समितीच्या नेतृत्वाने याबाबत नियमावली जाहीर करावी अशी आग्रही मागणी शहर समितीच्या बैठकीत करण्यात आली.
शिस्त आणि नियम न पाळता जो कुणीही उठतो महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेतो त्यामुळे इथले नेतृत्व कुणी करते याबाबत महाराष्ट्रातील नेत्यांच्यात देखील संभ्रमावस्था निर्माण होते त्यामुळे वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत अश्या परिस्थितीत लढ्याला बळकटी आणून आणि शिस्त आणण्याची गरज आहे.
सीमा प्रश्नाची चर्चा करायची असेल तर समिती नेतृत्वाशी सल्लामसलत करूनचं त्यांच्या परवानगीनेच त्यांची भेट घ्यावी किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीने भेट घेण्यासाठी कायमस्वरूपी एका शिष्टमंडळाची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी बैठकीत शहर समितीची पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली बैठकीत उपस्थित असलेल्या अनेकांची नावे शहर पुनर्रचना यादीत समाविष्ट करावी अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण समितीत काम करणारे अनेक युवक राष्ट्रीय पक्षात सहभागी होत आहेत. त्यावर महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाने विचार करावा आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. म ए समिती सर्वपक्षीय आहे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना सीमा लढ्यात सामावून घ्यावं केवळ शिवसेने सारख्या एका पक्षाला झुकते माप समिती नेतृत्वानं देऊ नये अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
सर्व गोष्टीचा विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी समिती नेतृत्वाने दिले. समितीत नियमावली लागू झाली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे शिस्तीचा अभावा मूळे खानापूर तालुका समितीची एकी फिस्कटली आहे. काही जणांनी कारण नसताना इथून जाऊन तिथे नाक खुपसल्यामुळे, हा प्रश्न जटिल झाला आहे.
त्यामुळे प्रोटोकॉल गरजेचा आहे त्यासाठी समितीच्या नेत्यांनी नियमावली घालावी.कार्यकर्त्यांनी ती नियमावली पाळण्याची गरज आहे.पुढील महिन्यांमध्ये विभागवार सक्रिय समितीत काम करणाऱ्यांची सूची घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल.शहर समितीची पुनर्रचना करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.