Saturday, January 18, 2025

/

…अन् पडला ग्रामपंचायतीसमोर कचर्‍याचा ढिगारा

 belgaum

ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि पीडिओ यांच्या अकार्यक्षमतेमुळे संतप्त नागरिकांनी आपल्या भागातील कचरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणुन ओतल्याची घटना आज मंगळवारी मुतगा येथे घडली.

मुतगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गोकुळनगर, श्रीरामनगर व साईनगर या भागातील घरगुती कचऱ्याची उचल गेल्या अनेक दिवसांपासून झालेली नाही. त्यामुळे या वसाहतींमधील संतप्त रहिवाशांनी आज चक्क गाडी भरून कचरा आणून ग्रामपंचायतीसमोर ओतला. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि पीडिओ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मिळालेल्या माहितीनुसार गोकुळनगर, श्रीरामनगर व साईनगर या भागात कचरा उचल करणाऱ्या गाडीचा चालक अचानक नोकरी सोडून गेल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.

यामुळेच वेळच्यावेळी कचऱ्याची उचल होऊ शकलेली नाही. मात्र याकडे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि संबंधित सदस्यांसह पीडिओंनी लक्ष न दिल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.Mutga gp

परिणामी सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे संबंधित भागातील रहिवाशांनी आज आपापल्या घरातील कचरा ग्रामपंचायतीसमोर टाकून आपला निषेध व्यक्त केला.

दरम्यान या आंदोलनात नागरी समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेले संबंधित भागाचे ग्रामपंचायत सदस्य येथील सहभागी झाले होते याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.