Sunday, May 19, 2024

/

वारकरी महासंघ बेळगाव ची बैठक संपन्न

 belgaum

बेळगाव महाद्वार रोड येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात वारकरी महासंघाची बैठक पार पडली.यावेळीं महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील महाराज यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाच्या दिंडी व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत दिनांक 21 जून रोजी आळंदी पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सोहळ्यातील सर्व व्यवस्थापनाशी चर्चा झाली 21 जून 22 रोजी प्रस्थान होत असून 11 जुलै रोजी दिंडीची सांगता होणार आहे.

या संपूर्ण सोहळ्यातील प्रत्येक दिवशी च्या व्यवस्थापनाची सखोल चर्चा झाली 21 जून रोजी प्रस्थान 22 23 पुणे 24 25 सासवड 26 जेजुरी 27 वाढले असा प्रवास करत दशमी दिवशी दिंडी पंढरपूर येथे पोहोचणार आहे त्यानंतर द्वादशी चा महाप्रसाद झाल्यावर दिंडीची सांगता होणार आहे या बैठकीत प्रास्ताविक व स्वागत ह भ प अशोक हारकारे यांनी केले.

अध्यक्ष भाऊसाहेब पाटील महाराज यांनी बैठकीत मार्गदर्शन केले ह भ प एस आर पाटील साहेब यांनी अहवाल वाचन केले सर्वसंमतीने अहवाल एकमताने मंजूर करण्यात आला.

 belgaum

हभप प्रभाकर सांबरेकर यांनी बैठकीची व्यवस्था केली होती तर ह-भ-प शंकरराव बाबली महाराज यांच्या आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली दोन वर्ष कोरोनाच्या महामारी मुळे दिंडी होऊ शकली नाही मात्र यावर्षी मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी होऊन दिंडी व्यवस्थित पार पडण्याचे निश्चित करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.