काकती येथील ‘हा माझा धर्म’ संघटनेतर्फे हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन बेळगाव (एचईआरएफ) यांच्या सहकार्याने बेळगावात पहिल्यांदाच काकती येथे येत्या रविवार दि. 29 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोफत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा पिढीतील (मुले-मुली) ज्यांचे वय 18 पूर्ण आहे, ते या शिबीरामध्ये सहभागी होऊ शकतात. सदर शिबिरात एचईआरएफ जवानांकडून नैसर्गिक आपत्तीतील बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
एखाद्या नैसर्गिक आपत्तीप्रसंगी जीव आणि वित्त हानी कशी रोखायची याच्या प्रात्यक्षिकांसह पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे, घरात अथवा अन्यत्र आग लागली तर काय करायचे, रस्ते अपघातातील जखमींचा जीव वाचवणे, हार्ट अटॅक आल्यावर, गुदमरल्यावर कृत्रिम श्वास कसा द्यावा, कोरोनासारख्या संकटात ऑक्सिजन पुरवठा किंव्हा आपल्या गावांत कांही संकट आल्यास जीवरक्षणाचे तसेच दोरीच्या सहाय्याने चढणे आणि उतरणे आदींचे प्रशिक्षण काकती येथे आयोजित शिबिरात दिले जाणार आहे.
सदर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातील प्रवेश मोफत असून शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी येत्या शुक्रवार दि. 27 मेपूर्वी नांव नोंदणी करणे गरजेचे आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9886103373 / 8050497740 अथवा एचईआरएफ ऑफिस दूरध्वनी क्र. 0831- 2009500 येथे संपर्क साधावा, असे आवाहन ‘हा माझा धर्म’ संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांनी केले आहे.