बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स अर्थात बीम्समधील स्टुडंट डेंट बॉडी निवडणुकीप्रसंगी झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी 15 विद्यार्थ्यांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीम्समधील स्टुडंट डेंट बॉडी निवडणुकीप्रसंगी झालेल्या भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना गेल्या 4 मे रोजी घडली. सदर घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी हाणामारीत सहभागी सहभागी 15 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्याच प्रमाणे हाणामारीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला त्याच्या मूळ गावी राजस्थानमधील उदयपूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांच्या नाकाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे. बीम्सचे प्रभारी संचालक बी. एस. विवेकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गेल्या 6 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसी पोलिस अधिक तपास करीत असून गुन्हा दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.