सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश व्यक्ती यांनी व्यक्त केले आहे.
हुक्केरी येथे आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेळगाव जिल्हा 18 मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून गणला जात असला तरी त्यामानाने येथील विकास खुंटला आहे.
चिक्कोडी, बैलहोंगल आणि बेळगाव अशा तीन विभागात सध्या जिल्ह्याचे कामकाज सुरू असून प्रशासकीय प्रगतीच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे तीन भागात विभाजन करणे आवश्यक आहे. सदर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री कत्ती म्हणाले.
राज्यातील मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याची प्रगती विविध कारणास्तव खुंटली आहे. विकास कामात अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे आगामी काळात बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
हे नेहमी सरळ आणि स्पष्ट वक्तव्यानं उमेश ओळखले जातात उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याच्या निर्मितीची मागणी देखील सर्वप्रथम उमेश कत्ती यांनीच केली होती त्यांच्या या मागणीनंतर उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याची मागणी पुढे येऊ लागली आहे आता बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मागणीसाठी देखील सर्वात पुढे उमेश कत्तीचं आहेत या अगोदरही जिल्हा विभाजनाची त्यांनी ही मागणी केली होती आता पुन्हा त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावं असे म्हटलय.
umesh katti tey vyakti.klay.kaymarathi lihtay