Saturday, December 21, 2024

/

उडपीचा कोटियान यंदाचा ‘कलमेश्वर -बसवेश्वर श्री’

 belgaum

बसवन कुडची येथील भीम वाल्मीकी युवा संघटनेतर्फे आयोजीत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील ‘कलमेश्वर -बसवेश्वर श्री 2022’ हा सर्वोच्च मानाचा किताब उडपीच्या नित्यानंद कोटियान याने पटकाविला. बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकर उपविजेता, तर उमेश गंगणे ‘बेस्ट पोझर’ ठरला.

बसवन कुडची येथील भिम वाल्मीकी युवा संघटनेच्यावतीने आयोजित ‘कलमेश्वर -बसवेश्वर श्री 2022’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा बुधवारी रात्री यशस्वीरित्या पार पडली. कर्नाटक असोसिएशनला ऑफ बॉडी बिल्डर्सच्या मान्यतेने आणि बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन तसेच बजरंग बली हनुमान पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पूजनाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच अजित सिद्दण्णावर, एम. के. गुरव, सुनील राऊत, शीतल पाटील, प्रकाश अनगोळकर, अमरेश जी. सी., गिरीश कलेकन्नावर, विजय कदम, बसवंत हलगेकर, नागेश देवटे, वैभव सत्यनावर आदींसह बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि भीम वाल्मिकी युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. Body building

सदर राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या विविध वजनी गटातील पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते पुढील प्रमाणे आहेत. 55 किलो वजनी गट : आकाश निगराणी (शिमोगा), विठ्ठल चव्हाण (बागलकोट), मंथन धामणेकर (बेळगाव), रितिक लाखे (बेळगाव), अरीफ आफताब किल्लेदार (बेळगाव). 60 किलो गट : उमेश गंगणे (बेळगाव), अभिलाष (उडपी), मंजुनाथ (दावणगिरी), व्यंकटेश ताशिलदार (बेळगाव), आदित्य काटकर (बेळगाव). 65 किलो गट :अक्षय रावळ (बेळगाव), दिनेश आचार्य (मंगळूर), सोमशेखर खारवी (उडपी), ओमकार गोड्डी (बेळगाव), शिवकुमार पाटील (बेळगाव).

70 किलो गट : श्रवणन एच. (बेंगलोर), महेश गवळी (बेळगाव), मल्लिकार्जुन अंबिगर (बागलकोट), सुनील पाटील (बेळगाव), साहेबलाल एम. सी. (विजापूर). 75 किलो गट : प्रताप कालकुंद्रिकर (बेळगाव), रवी कुमार (बेंगलोर), तपसकुमार नाईक (चित्रदुर्ग), अफरोज ताशिलदार (बेळगाव), रवी गाडीवड्डर (बेळगाव). 80 किलो गट : विशाल चव्हाण (बेळगाव), गजानन काकतीकर (बेळगाव), प्रसाद बाचीकर (बेळगाव), भरतकुमार आचार (दावणगिरी), मुफीज मुल्ला (बेळगाव). 85 किलो वजनी गट : नित्यानंद कोटियान (उडपी), किशोर के.पी. (बेंगलोर), शामंत गौडा (बेळगाव), आकाश नेसरीकर (बेळगाव), सौरभ खन्नूकर (बेळगाव). 85 किलो वरील गट : अविनाश केएसआरटीसी (हासन), रेवंत (बेंगलोर), प्रतीक बाळेकुंद्री (बेळगाव), दीपक बन्स (बेळगाव), पवन सालगुडे (बेळगाव). टायटल विजेता : नित्यानंद कोटियान (उडपी). उपविजेता : प्रताप कालकुंद्रिकर (बेळगाव). बेस्ट पोझर : उमेश गंगणे (बेळगाव).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.