Tuesday, February 11, 2025

/

‘स्टार’ची लवकरच शिमोगा, म्हैसूर थेट विमानसेवा

 belgaum

स्टार एअर या देशातील आघाडीच्या विमान कंपनीकडून बेळगाव येथून शिमोगा आणि म्हैसूर अशा दोन थेट विमानसेवा लवकरच सुरू केल्या जाणार आहेत स्टार एअरलाइन्सचे प्रमुख संजय घोडावत यांनी गुरुवारी बेळगाव सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

अलीकडेच स्टार एअरने बेळगाव ते नागपूर ही विमानसेवा सुरू केली आहे. आता लवकरच शिमोगा आणि म्हैसूर अशी थेट विमानसेवा बेळगाव होऊन सुरू होईल असे घोडावत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे प्रोप्रायटर संजय घोडावत यांनी सांगितले.Sanjay ghodawat

त्याचप्रमाणे धारवाड येथे आपण तेल शुद्धीकरण कारखान्याची उभारणी देखील करणार आहोत. ज्यामुळे 500 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली.

पत्रकारांसाठी महत्त्वाची घोषणा करताना संजय घोडावत यांनी कर्नाटक अंतर्गत विमान प्रवासासाठी मान्यता प्राप्त (ॲक्रिडेटेड) पत्रकारांना स्टार एअरकडून प्रवास भाड्यात 20 टक्के सवलत दिली जाईल, असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.