कर्नाटकात मुस्लिम समाजाबाबत सुरू असलेल्या हिंदू संघटनांच्या मोहिमेबद्दल चर्चा होत असताना आणखी एका नवीन मेगा अभियानाची तयारी चालली आहे.हिजाब हलाल आणि आर्थिक निर्बंधा नंतर आणखी एक मोठे अभियान चालवण्याच्या तयारीत हिंदू संघटना आहेत यात श्री राम सेनेने एका नवीन विषयावर अभियान छेडण्याची योजना बनवली आहे.
राज्यात वक्फ बोर्ड वर बंदी आणि वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीचे अभियान सुरू केले जाणार आहे याबाबत श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी एक वक्तव्य केले आहे.
1991 साली काँग्रेस पक्षाने वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा अंमलात आणला होता. देशात वक्फ बोर्डाची संपत्ती सर्वाधिक असलेली दुसऱ्या क्रमांकावर आहे एक नंबर वर रेल्वे आणि मिलिटरीची संपत्ती आहे दोन नंबर वर वक्फ बोर्ड आहे असे मुतालिक म्हणाले.
वक्फ बोर्डाचा कायदा किती घाण आहे बांधकाम करायचे असल्यास जागा कब्जा घेऊ शकतो केवळ वक्फ बोर्डासाठी एक पत्रकार परिषद घेतोअसें मुतालिक यांनी म्हटले आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात वक्फच्या संपत्त्या आहेत त्या बाबत आर टी आय द्वारा माहिती घेऊन यावर मोठे अभियान उभे करून पुरावे सुप्रीम कोर्टापर्यंत पोचवू असे मुतालिक यांनी म्हटले आहे.याशिवाय वक्फ बोर्ड कायदा वापस घेण्यासाठी जोरदार मागणी करू असेही त्यांनी म्हटले आहे.
कोणकोण वक्फ बोर्डाशी संबंधित आहे याची माहिती गोळा केली जाईल खूप मोठा घोटाळा ठिकाणी आहे सरकारने यात हस्तक्षेप करू नये अन्यथा देशावर नियंत्रण उरणार नाही अशी भीती मुतालिक यांनी यावेळी व्यक्त केली.