आत्महत्या करणाऱ्या ठेकेदाराने बनवलेले रस्ते आणि स्मार्ट सिटी बेळगावचे रस्ते यांची तुलना करा , तुम्हालाच समजेल कुणाचे पाय किती खोलात आहेत.मयत संतोष पाटील यांनी स्मार्ट सिटी पेक्षा चांगले रस्ते बनवलेत असेमत सुजित मुळगुंद यांनी व्यक्त केल आहे.
ना खाऊंगा ना खाने दुंगा मी भ्रष्टाचार भारत मुक्त करेन असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता मात्र हा नारा आज बेळगावात चुकीचा ठरला आहे. कारण केवळ भ्रष्टाचारामुळे आणि भ्रष्टाचारासाठी संतोष पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच्या जीव घेण्यास ग्रामीण विकास मंत्री के एस ईश्वरप्पा जबाबदार आहेत असा आरोप देखील मुळगुंद यांनी केला आहे.
यासंपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे लोकायुक्तने यात स्वता होऊन गुन्हा दाखल करून चौकशी करायला हवी त्यांच्या कुटुंबियांना न्याय ध्यायचं असेल तर या प्रकरणातील भ्रष्टाचाऱ्यांना शासन करायला हवे असेही मत मूळगुंद यांनी मांडले आहे.
संतोष पाटील या कॉन्ट्रॅक्टरने मोदी यांना पत्र लिहून 40 टक्के कमिशन मंत्री मागत असल्याचे पत्राद्वारे कळवले होते मात्र पंतप्रधानांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली नव्हती. मयत ठेकेदाराने हिंडलगा येथील तयार केलेले रस्ते आणि बेळगाव स्मार्ट सिटीचे रस्ते यांची तुलना करायला हवी याची पहाणी अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणांनी करावी अशी मागणी करत नक्कीच त्यांनी हिंडलगा येथील रस्ते चांगल्या दर्जाचे बनवले आहेत ते निश्चित स्मार्ट सिटीच्या रस्त्यांपेक्षा चांगले आहेत असेही मुळगुंद यांनी म्हटले आहे.
40 टक्के कमिशन मागणाऱ्या मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी मोदींनी करावी अश्या वर लक्ष ठेवावे आणि मंत्रिपदाचा त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही सुजित यांनी केलीय.