टिळकवाडी येथील एस के ई संस्थेच्या राणी पार्वती देवी कला व वाणिज्य महाविद्यालयात येत्या दि २३ एप्रिल रोजी “राष्ट्रीय शिक्षण नीती २०२०: शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल” या विषयावर एकदिवसी य राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे उपकुलपती डॉ रामचंद्रगौडा यांच्या हस्ते चर्चासत्राचे उदघाटन होईल तर अध्यक्षस्थानी एस के ई संस्थेचे चेअरमन किरण ठाकूर असतील.
या चर्चासत्रामध्ये विश्वविद्यालय अनुदान आयोग (यु जी सी) च्या अधिकारी डॉ लता के सी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
धारवाड विभागाचे जॉईंट डायरेक्टर ऑफ कॉलेजिएट एज्युकेशन वाय एस हनुमंतराय, मुंबईच्या पत्रकार, लेखिका व समीक्षक रेखा देशपांडे, बेळगावच्या उद्योग व वाणिज्य विभागाचे उपसंचालक रवींद्र मदिहळ्ळी इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.
राष्ट्रीय शिक्षण नीती २०२० नुसार जे बदल शिक्षण क्षेत्रात होत आहेत किंवा अपेक्षित आहेत त्याबद्दल विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी इंग्रजी, मराठी, कन्नड व हिंदी भाषेत आपले शोधनिबंध सादर करणार असून पदवी किंवा पदव्युत्तर महाविद्यालयाचे जे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना या चर्चासत्रात सहभागी होऊ इच्छितात,
त्यांनी डॉ. एस एच पाटील (दूरध्वनी ९४४९९७३२८६) किंवा श्रीमती हेमा अनगोळकर (दूरध्वनी ९९०१४६९२१७) यांच्याशी संपर्क साधावा असे प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी कळविले आहे.