बेळगाव तालुक्यातील रणकुंडये खून प्रकरणाचा तिढा सोडवण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी याप्रकरणी चौघाना अटक केली आहे.शनिवारी मध्यरात्री रणकुंडये येथील नागेश पाटील वय 31 या युवकाचे घरातून अपहरण करून धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करत निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
पुर्वीचे नागेश पाटील याच्या मित्रांनीच चार वर्षांपूर्वी दिलेल्या वीस हजार रुपयांचा व्यवहारचं या खुनासाठी कारणीभुत ठरला आहे.या खून प्रकरणी आरोपी असलेला प्रमोद सहदेव पाटील वय31 त्याचा भाऊ श्रीधर सहदेव पाटील वय28, महेंद्र कंग्राळकर वय 21 सगळे रा.रणकुंडये, भोमानी डुकरे वय 33 रा किणये यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
खून झालेला नागेश पाटील यांच्या वडिलांनी चार वर्षांपूर्वी प्रमोद पाटील यांना वीस हजार रुपये दिले होते. त्यामुळे नागेश ने प्रमोद त्याच्याकडे पैसे परत देण्याची एकसारखा मागणी करत होते गेल्या दोन वर्षापूर्वी याच कारणामुळे या दोघांमध्ये मारामारी झाली होती.
एक सारखा पैशाची मागणी करू नकोस असे प्रमोद पाटील याने नागेश पाटील याला सुनावले आले होते हाच राग मनात ठेवून प्रमोद पाटील याने आपला भाऊ श्रीधर आणि मित्र महेशला सोबतीला घेऊन नागेश याचा काटा काढला मध्यरात्री त्याच्या घरी जाऊन त्याचे अपहरन करून त्याचा खून केला होता.
प्रमोद पाटील शनिवारी मध्यरात्री नागेशच्या घरी गेले कार मधून नागेशचे अपहरण केले व त्याचा खून करून त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोर टाकून दिला होता.बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केवळ एका दिवसातच या प्रकरणाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे