मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर लवकर भरावा या उद्देशाने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बेळगाव महापालिकेने ‘अर्ली बर्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जे नागरिक 2022 -23 सालचा मालमत्ता कर मागील कोणत्याही थकबाकी विना येत्या 30 एप्रिलपूर्वी भरतील त्यांना करामध्ये 5 टक्के सूट दिली जाणार आहे.
यंदा मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. तो मागील 2020 -21 साला प्रमाणेच असणार आहे. नागरिकांनी पेटीएम अथवा http://belagavicitycorp.org/ याठिकाणी भरावयाचा आहे.
ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. http://belagavicitycorp.org/ या ठिकाणी जा (केवळ क्रेडिट /डेबिट /इंटरनेट /बँकिंगद्वारे पेमेंट) ऑनलाईन सर्व्हीसवर क्लिक करा. पीआयडी एंटर करा आणि फॉर्म 1 मिळविण्यासाठी सर्च बटन क्लिक करा.
त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करा. जर तुम्हाला तुमचा पीआयडी माहीत नसेल तर तुमचा प्रभाग क्र., जुना मूल्यांकन क्र., नवा मूल्यांकन क्र., मालकाचे नांव किंवा मोबाईल क्रमांक या निकषांद्वारे ‘सर्च’चा वापर करा. त्यानंतर सर्च बटन केल्यास तुम्हाला तुमच्या मालमत्तेचा तपशील मिळू शकतो.
व्ह्यू लिंक वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या संपूर्ण मालमत्ता घराचा तपशील उपलब्ध होऊ शकतो. कृपया पेमेंट करण्यापूर्वी चलन डाऊनलोड करा. कारण एकदा का पेमेंट झाले तर तुम्हाला चलन पाहता येणार नाही. यशस्वी ऑनलाइन मालमत्ता कर पेमेंटवर कृपया पोचपावती डाउनलोड किंवा प्रिंट करा. मालमत्ता कर पेटीएमद्वारे भरणार असाल तर त्यासाठी देखील पीआयडी नंबर आवश्यक आहे.