Friday, May 3, 2024

/

बेळगाव शिवजयंती उत्सव मंडळांचे असे कार्यक्रम जाहीर

 belgaum

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव यांनी आपला शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला असून तो खालील प्रमाणे आहे.

सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सकाळी 7 वाजता शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे. त्यानंतर सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती, तसेच सकाळी 10 वाजता शहापूर शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण आणि पूजन. बुधवार दि. 4 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता श्रींच्या पालखीचे पूजन करून नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची सुरुवात. रविवार दि. 8 मे 2022 रोजी येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे शिवजयंतीनिमित्त सकाळी 8 वाजता राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धा.

शहापूर शिवजयंती मिरवणूक कार्यक्रम जाहीर

 belgaum

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला असून बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. नाथ पै चौक येथे मिरवणुकीचे उद्घाटन केले जाणार आहे.Shiv jayanti procession

चित्ररथ मिरवणूक उद्घाटन समारंभास मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून शहापूर विभागातील सर्व मंडळांनी आपले चित्ररथ बॅ. नाथ पै चौकात वेळेवर आणावेत. मिरवणूक अत्यंत शांतपणे व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व शिवजयंती उत्सव मंडळांसह समस्त शिवभक्तांनी सहकार्य करावे, अशी विनंती महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष महादेव पाटील आणि नगरसेवक नितीन जाधव यांनी केले आहे.

शहापूर येथील चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. बॅरिस्टर नाथ पै चौक येथून प्रारंभ खडेबाजार शहापूर, एसपीएम रोड, रेल्वे ब्रिज मार्गे शनिमंदिर, स्टेशन रोड मार्गे सेंट मेरीज हायस्कूल, मारुती पुतळा तेथून धर्मवीर संभाजी चौक मार्गे मुख्य मिरवणुकीत सहभाग पुढे किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे स्टेशन रोड, शनी मंदिर मार्गे रेल्वे ब्रिज, एसपीएम रोड मार्गे शहापूर येथे सांगता.

शहापुरातील चित्ररथ देखील असतील बक्षिसास पात्र

यंदाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील उत्कृष्ट चित्ररथ देखावे, मर्दानी प्रात्यक्षिके आदींसाठी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आकर्षक भव्य रकमेची बक्षिसे जाहीर केली असून शहापुर, वडगाव, होसूर, खासबाग या भागातील चित्ररथ शहरात आल्यास ते देखील या बक्षिसासाठी पात्र असतील, असे स्पष्ट केले आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी यावेळी शिवजयंती निमित्त येत्या बुधवार दि. 4 मे 2022 रोजी निघणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीतील उत्कृष्ट चित्र देखावे मर्दानी प्रात्यक्षिके आदींसाठी मोठ्या रकमेची बक्षिसे जाहीर केली आहेत. शहरातील मिरवणुकीत शहापुर, वडगाव, होसूर व खासबाग या भागातील शिवजयंती चित्र देखावे सहभागी झाल्यास सदरी चित्ररथ आपण जाहीर केलेल्या बक्षिसांना पात्र राहतील, अशी माहिती आमदार बेनके यांनी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांना दिली आहे. त्याचप्रमाणे शहापूर विभागातील चित्ररथ यांचे परीक्षण धर्मवीर संभाजी चौक आणि टिळक चौक या ठिकाणी देखील केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्यावतीने येत्या सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी शहापूर विभागातील मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष महादेव पाटील व नगरसेवक नितीन जाधव यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.