बेळगाव ‘येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी २१ लाख ५६ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेकडे १०५ कोटी ६७ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
तर एन. पी. ए. चे प्रमाण ०.३५ टक्क्यावर आले आहे. अनेक कारणामुळे सर्वत्र आर्थिक घडी विस्कटली असली तरीही बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे’ अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी दिली.
आज बोलाविलेल्या संचालक व विविध शाखांचे व्यवस्थापक यांच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अनिता मूल्या यांनी स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक
वर्षात ७५ कोटी ९७ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले असून खेळते भांडवल १२७ कोटी ९६ लाख अाहे. यावेळी प्रथमच बँकेच्या मुख्य शाखेसह शहापूर ,गोवावेस आणि मार्केट यार्ड शाखा नफ्यात आल्या आहेत.
व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांनी संचालकांच्यावतीने चेअरमन प्रदीप अष्टेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी रणजित चव्हाण पाटील. शिवराज पाटील व अनंत लाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गजानन पाटील, रवी दोडन्नवर, सौ सुवर्णा शहापूरकर , सुहास तरळ, गजानन ठोकणेकर ,विद्याधर कुरणे व मारूती शिगीहळ्ळी आदी संचालक उपस्थित होते.