Sunday, December 1, 2024

/

‘गुलाबी जांबळट छटेच्या फुलांची बहार’-पिंक ट्रंपेट

 belgaum

आमचं बेळगाव खुप लोकांना आवडतं याची कारणं खुप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे ,ईथली हवा आणि दुर्मिळ वृक्षवल्ली.ईथं मोठ मोठाले भारतीय वृक्ष आहेतच शिवाय ब्रिटिशांनी लावलेली काही परप्रांतीय वृक्ष पण आहेत.त्यातलाचं एक दक्षिण अमेरिकन वृक्ष म्हणजे “टॕबेलिया ॲव्हेलँडे” किंवा पिंक ट्रंपेट आहे. हे पर्णप्राती झाड फुलंलेलं पहाणं हे एक नेत्रसुखा देणारा समारंभच असतो.या झाडाची फुलं मोठया नळीसारखी असतात.पाकळ्या गुलाबी राणी रंगाच्या असतात.हे झाड जेव्हा फुलतं तेव्हा संपूर्ण झाड फक्त फुलानी डवरलेलं असतं.

हिवाळ्याच्या सुरूवातीसच यांच्या पानांची गळती सुरू होते.
.पानांची रचना पण खोडाच्या मध्यावरुन सुरू होऊन मग पसरलेली असते.संपूर्ण पानगळती झाल्या नंतर आलेली नवपालवी कळ्या घेऊन येते आणि मग फुलं फुलतात.हे झाड चाळीस फुटांईतकं उंच वाढतं झाडांच्या डहाळ्या अगदी सहज मोडतील ईतक्या नाजुक असतात पण फुलांचा डोलारा सांभाळत असतात.एखाद्या पिरॕमीड प्रमाणे सुरूवात झालेल्या फुलांचा डोलारा हळुवारपणे मंटपासारखा झाडावरून भरुन जातो.सध्या हे झाड सगळी कडे फुललेलंआहे.सगळ्यांनी अवश्य पहावं.

हा वृक्ष दक्षिण अमेरिकेतील असुन पेरुग्वे देशाचं राष्ट्रीय वृक्ष आहे.झाडावर पडलेल्या सुर्यप्रकाशात फुलांना आलेली झळाळी खुपच मोहक असते.
आमचं बेळगाव खुप लोकांना आवडतं याची कारणं खुप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे ,इथली हवा आणि दुर्मिळ वृक्षवल्ली.थं मोठ मोठे भारतीय वृक्ष आहेतच शिवाय ब्रिटिशांनी लावलेली काही परप्रांतीय वृक्ष पण आहेत.त्यातलाचं एक दक्षिण अमेरिकन वृक्ष म्हणजे “टॕबेलिया ॲव्हेलँडे” किंवा पिंक ट्रंपेट आहे.

हे पर्णप्राती झाड फुलंलेलं पहाणं हे एक नेत्रसुखा देणारा समारंभच असतो.या झाडाची फुलं मोठया नळीसारखी असतात.पाकळ्या गुलाबी राणी रंगाच्या असतात.हे झाड जेव्हा फुलतं तेव्हा संपूर्ण झाड फक्त फुलानी डवरलेलं असतं.

हिवाळ्याच्या सुरूवातीसच यांच्या पानांची गळती सुरू होते.
.पानांची रचना पण खोडाच्या मध्यावरुन सुरू होऊन मग पसरलेली असते.संपूर्ण पानगळती झाल्या नंतर आलेली नवपालवी कळ्या घेऊन येते आणि मग फुलं फुलतात.हे झाड चाळीस फुटांतकं उंच वाढतं झाडांच्या डहाळ्या अगदी सहज मोडतील इतक्या नाजुक असतात पण फुलांचा डोलारा सांभाळत असतात.

एखाद्या पिरॕमीड प्रमाणे सुरूवात झालेल्या फुलांचा डोलारा हळुवारपणे मंटपासारखा झाडावरून भरुन जातो.सध्या हे झाड सगळी कडे फुललेलंआहे.सगळ्यांनी अवश्य पहावं.
हा वृक्ष दक्षिण अमेरिकेतील असुन पेरुग्वे देशाचं राष्ट्रीय वृक्ष आहे.झाडावर पडलेल्या सुर्यप्रकाशात फुलांना आलेली झळाळी खुपच मोहक असते. Pink trampet

मार्च एप्रिल महिन्यात या निष्पर्ण वृक्षांच्या फिकट गुलाबी जांबळट छटेच्या फुलांची बहार बेळगाव मधील अनेक रस्त्यांवर दिसते आहे.रस्त्याच्या बाजूने याची अनेक झाडे आहेत त्यामुळे बेळगाव शहरात या झाडांची फुले अनेक ठिकाणी नजरेस पडत आहेत.

मुळात बेळगाव शहरात आणि विशेषतः कॅन्टोन्मेंट भागात झाडांची संख्या अनेक आहे बेळगावला ग्रीन बेळगाव असे अनेकजण संबोधित करत असतात.भाग्यनगर, शाहुनगर येथील वसाहतीत रस्त्याच्या कडेने उंचच उंच वाढलेली झाडे फुललेली आहेत. झाडावरून ही फुले खाली पडतानाचे दृश्य अत्यंत मोहक दिसत असून जणू काय रस्त्यावर गुलाबी कार्पेट अंथरल्यासारखे वाटत आहे.

सौजन्य -लालन प्रभू (माजी नगरसेविका,अभ्यासक बेळगाव)

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.