कर्नाटक पोलीस राज्यात सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना सुखा समाधानाने राहता यावे यासाठी, 20 हजार नवी प्रशस्त घरे मोठ्या बांधण्याची योजना सुरू आहे.यामधील 10 हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.आहे.अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली आहे.
बेळगाव येथील केएसआरपी पोलीस कॉन्सटेबल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या चौथ्या पथकाचे पासिंग परेड सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ज्ञानेंद्र म्हणाले, आपल्या देशातील पोलीस दल शिस्त आणि प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत. सामाजिक शांतता सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस करत आहेत. कर्नाटक पोलीस देशात चांगली सेवा करत आहे.
निवडणुकीदरम्यान आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाचे शौर्य, धैर्य आणि चांगले कौशल्य दाखवणे हा आमचा अभिमान आहे.पोलीस खाते देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे.
पोलीस ठाण्यांचा दर्जा सुधारण्यात आला आहे. ते म्हणाले की 200 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असून 100 पोलीस ठाणी सर्वोच्च स्तरावर बांधण्यात आली आहेत.असही गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी स्पष्ट केले.