माजी नौदल कर्मचारी संघटना बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 1 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय नौदल वाद्यवृंदाच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज मैदानावर भारतीय नौदल वाद्यवृंदच्या या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मैफलीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आयजीपी डाॅ. सतीशकुमार आणि विभागीय आयुक्त अमलान आदित्य बिश्वास उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे बेळगाव एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी, एसकेई सोसायटी बेळगावचे अध्यक्ष किरण ठाकुर, एअर स्टेशन बेळगावचे एओसी एअर कमांडर एस. डी. मुकुल आणि एक्सपर्ट व्हॉल्व अँड इक्विपमेंट प्रा. लि. चे विनायक लोकूर सन्माननीय अतिथी म्हणून हजर राहणार आहेत.
भारतीय नौदलाच्या या वाद्यवृंदाचे देश-विदेशात कार्यक्रम झाले असून बेळगाव ते यापूर्वी दोन वेळा हा वाद्यवृंद आपला बहारदार कार्यक्रम सादर करून गेला आहे.
त्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रथमच माजी नौदल कर्मचारी संघटनेतर्फे येथे रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत या वाद्यवृंदाची संगीत मैफिल आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संगीतप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन माजी नौदल कर्मचारी संघटना बेळगावचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले आहे.