कर्नाटक विधानसभेची निवडणूक 2023 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आप पक्षात प्रवेश केलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचं सदस्यत्व मिळवून दिलंय. यावेळी उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, दिल्लीतील आप सरकारची प्रतिमा देशभरात विखुरत आहे. त्याचाच परिणाम पंजाबमध्ये दिसून आला.
पंजाबच्या निकालामध्ये जनतेनं अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला आपल कौल दिल होत आता त्याची लाट दक्षिणेतही पाहायला मिळत आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी नोकरी सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. भास्कर राव हे बंगळुरूचे पोलीस आयुक्त होते. जे काम नेत्यांना करायचं होतं, ते समाजहिताचं काम राव यांनी स्वत: केले आहे.असे सिसोदिया यांनी सांगितलंय.
माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव म्हणाले, मी 25 वर्षे पोलिस नोकरी केलीय. शिवाय, सैन्यातही कामगिरी बजावलीय आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संघर्ष आणि जीवन पाहून मी प्रभावित झालो.
कर्नाटकातील सामान्य माणसालाही बदल हवाय. पारंपरिक पक्ष आपण खूप बघितले आहेत. पक्ष गेले, पण व्यवस्था बदलली नाहीय. म्हणून, मी आम आदमी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला.