Friday, January 17, 2025

/

रेल्वे स्थानकासमोर शिवरायांची प्रतिमा बसवा

 belgaum

पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर बसविण्यात आलेल्या महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभाव आहे ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे.

तेव्हा केंद्र सरकारने बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमानमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.

बेळगाव रेल्वे स्थानक येथे आज शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुतालिक यांनी उपरोक्त मागणी केली. ते म्हणाले की, पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील भिंतीवर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, संगोळी रायण्णा, कित्तूर राणी चन्नम्मा अशा महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. तथापि दुर्देव आणि खेदाची बाब म्हणजे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रतिमा नाही.

माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे की शिवरायांच्या प्रतिमेला रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतीकारांचा प्रतिमांमध्ये स्थान दिले जावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःसाठी भाषेसाठी अथवा एखाद्या जातीसाठी नव्हे तर संपूर्ण देश हितासाठी लढा उभारला. तेंव्हा त्यांची प्रतिमा देखील रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते.MUTALIK pramod

महापुरुष व क्रांतीकारांच्या प्रतिमांमध्ये हिंदू संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या हिंदु राष्ट्राची स्थापना करणार्‍या या महापुरुषाची प्रतिमा नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. तरी केंद्र सरकार आणि या भागाच्या खासदारांकडे माझी मागणी आहे की त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतीकारांचा प्रतिमांमध्ये अंतर्भाव करावा अशी माझी मागणी असून छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी खासदारांनी केंद्राकडे आग्रह धरावा, असे प्रमोद मुतालिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानात यावनी सत्तेविरुद्ध सर्वप्रथम बंडाचा झेंडा फडकवला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदू पद बादशाही स्थापन करून ब्रिटिशांनाही कुर्निसात करण्यास भाग पाडले. शिवराय हे आदर्श राजा प्रजाहितदक्ष जन पालक म्हणून आजही नावाजले जातात. आज बेळगावमध्ये नुतन रेल्वे स्टेशन होत असून सुशोभित करण्यात येत आहे. तेथे क्रांतीकारकांच्या प्रतिमा स्थापित करण्यात येत आहेत. हिंदूंचे परमदैवत आणि प्रेरणा शक्ती असणाऱ्या छत्रपतींना मात्र तेथे स्थान नसणे म्हणजे उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेत त्यांचा जयजयकार करत मतांचा जोगवा मागून सरकार स्थापन करणाऱ्या केंद्र सरकारला छत्रपतींचा सोयीस्कर विसर पडला आहे. हा दांभिकपणा दाखवणाऱ्या केंद्र सरकारचा जनता निषेध करत आहे. हिंदुत्वाचे पाठीराखे म्हणविणाऱ्या केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाला जाग येणार आहे काय ? असा संतप्त सवाल जनतेकडून केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.