आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील यांनी केलेले काम आणि आर्थिक व्यवहारा विषयी ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री ईश्वराप्पा यांना भेटलेली गोष्ट खरी आहे अशी स्फोटक माहिती हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी दिली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्षांनी ‘मी आणि संतोष दोन वेळा बेंगलोर मध्ये जाऊन ईश्वराप्पा यांना भेटलो होतो गावामध्ये लक्ष्मी यात्रा असल्याकारणाने रस्त्यांचे निर्माण व्हावे या दृष्टी कोणातून आम्ही मंत्री ईश्वराप्पा यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती असा खुलासा त्यांनी दिलाय.
ईश्वराप्पा यांनी यावेळी काम चांगल्या पद्धतीने करा सगळे व्यवस्थित करूया असं म्हटलं होतं आणि मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणेच संतोष आणि चार कोटी रुपयांची 108 काम केली होती असेही मन्नोळकर यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर मी सुद्धा या कामाबद्दल ग्रामीण विकास खात्याला पत्र व्यवहार केला होता आता माझ्या विरोधात आमदारानी आरोप केलाय असे कानावर आले आहे त्यांनी केलेला आरोप चुकीचा आणि खोडसाळपणाचा आहे.संतोष पाटील यांच्या आत्महत्ये मुळे मला पण खूप त्रास झालाय सरकारने त्यांच्या कुटुंबांना मदत द्यावी असे ते म्हणाले.
मंत्र्यावर गुन्हा दाखल
पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्री ईश्वराप्पा यांच्या विरोधात ठेकेदाराच्या आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे काँग्रेससह विरोधी पक्षाने गुन्हा नोंद करावा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जोरदार लावून धरली आहे.