बेळगाव शहरातील गो गो स्पोर्ट्सतर्फे आयोजित फुलपीच बेळगाव वाॅर्ड वाईज टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा -2022 या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज मंगळवारी दिमाखात पार पडला.
शहरातील छ. संभाजी उद्यान येथे या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आजच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका वैशाली भातकांडे,भाजप नेते राहुल मुचंडी नगरसेवक जयंत जाधव, रितेश जुवेकर, वसंत, अनिल गेंजी आणि विनायक जुवेकर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच बक्षिसादाखल देण्यात येणाऱ्या आकर्षक चषकांचे अनावरण करण्यात आले.
नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या उपस्थितीत भाजप नेते राहुल मुचंडी यांच्या हस्ते यष्टी पूजन करून स्पर्धेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन समारंभास निमंत्रितांसह गो गो स्पोर्ट्सचे पदाधिकारी, सदस्य आणि बहुसंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या संघास 51 हजार रुपये व चषक आणि उपविजेत्या संघाला 25 हजार रूपये व चषक असे पारितोषिक दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त आकर्षक वैयक्तिक बक्षीसही पुरस्कृत करण्यात आली आहेत.
सदर मर्यादित 8 षटकांच्या वार्ड वाईज क्रिकेट स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग दर्शविला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 14 एप्रिल रोजी होणार आहे. स्पर्धेचे आज उद्घाटन झाल्यानंतर आता उद्या बुधवारपासून स्पर्धेला रीतसर सुरुवात होणार आहे.