जायंट्स मेन ही संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे कार्य करीत आहे .या संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असे आहे’ असे विचार मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले .
जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या शाखा क्रमांक सहाची राज्यस्तरीय परिषद ‘फेडकॉन’सोमवारी संपन्न झाली.
कपिलेश्वर रोडवरील शिवम हॉलमध्ये संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष अनंत जांगळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आप्पासाहेब गुरव उपस्थित होते. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने या परिषदेचे आयोजन केले होते व्यासपीठावर जायंट्सचे सेंट्रल कमिटी सदस्य दिनकर अमीन ,स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर ,बेळगाव मेनचे अध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष मोहन सर्वी, फेडरेशन सेक्रेटरी अनंत लाड व जायंट्स मेनचे सेक्रेटरी विजय बनसुर उपस्थित होते .
आप्पासाहेब गुरव यांनी दीपप्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन केले. बेंगलोर ,उडपी ,धारवाड- हुबळी ,ब्रह्मावर, मूनवळी आणि बेळगाव आदी ठिकाणाहून आलेल्या 100 सदस्यांचा या परिषदेत सहभाग होता.
उद्घाटनानंतर झालेल्या चर्चासत्रात दिनकर अमीन, मोहन कारेकर व फेडरेशनच्या पुढील अध्यक्ष तारादेवी वाली यांनी मार्गदर्शन केले. विविध विषयावर चर्चा झाली आणि जायंट्स चळवळ अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
*शायना यांच्या हस्ते बक्षीस वितरण*
सायंकाळी चार वाजता परिषदेचा समारोपाचा कार्यक्रम झाला यावेळी जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन च्या जागतिक अध्यक्षा शायना एन सी उपस्थित होत्या . त्यांचा सन्मान अनंत जांगळे यांनी केला. शायना यांच्या हस्ते गेल्या दोन वर्षातील विविध उपक्रमाबद्दल विजेत्या ग्रुप्स आणि व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .उत्कृष्ट उपक्रमाबद्दल बेळगाव मेन व बेळगाव सखी यांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले.अनंत लाड यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन विभागीय संचालक मदन बामणे यांनी केले.