कोलंबो श्रीलंका येथे अलीकडेच पार पडलेल्या इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून बेळगावसह देशाचे नांव उज्ज्वल करणार्या इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी (कोरी) या जलतरणपटुंचा बेळगावात खास सत्कार करण्यात आला.
कोलंबो (श्रीलंका) येथील इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावचे आघाडीचे जलतरणपटू इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी यांनी एकूण 12 पदकांची लयलूट करताना देशाचे नांव उज्ज्वल केले.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंद्रजीत याने जलतरणाच्या 6 प्रकारात 4 सुवर्ण पदक आणि 2 रौप्य पदके तर ज्योती यांनी 7 जलतरण प्रकारात 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक हस्तगत केले. सदर कामगिरीबद्दल या दोन्ही जलतरणपटुंचा शहरात आयोजित खास समारंभात कारंजी मठाचे पु. श्री. गुरुसिद्ध स्वामीजी आणि बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
जलतरणपटू इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी हे उभयता स्विमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरिस स्विमिंग क्लब बेळगावचे सदस्य आहेत. हे दोघेही सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात.
त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आणि प्रसाद तेंडूलकर यांचे मार्गदर्शन तसेच डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. विवेक सावजी, लता कित्तूर, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया आदींचे प्रोत्साहन लागत आहे.