बेळगाव येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांनी आता शेतकरी विश्वासघात सप्ताहाचे आयोजन केले आहे या निमित्ताने एका सप्ताहामध्ये विविध ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन करून सरकारला आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
19 नोव्हेंबर 2021रोजी केंद्र सरकारने बनवलेले तीन कृषी कायदे मागे घेतले होते आणि एम एस पी कमीत कमी दर ठरवण्यासाठी तज्ञ समितीची रचना करण्याचे आश्वासन दिले होते मात्र याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही यासाठी संयुक्त किसान मोर्चा ने देशव्यापी आंदोलन केले आहे त्या अनुषंगाने बेळगावात देखील आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 एप्रिल ते 17 एप्रिल या एका आठवड्याभरात विविध ठिकाणी आंदोलन करून मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येणार आहेशेतकऱ्यांचा नवीन( एम एस पी) कमीत कमी दर ठरवण्यासाठी केंद्र सरकारकडून तज्ञ समितीची रचना करण्यात यावी कर्नाटक सरकारने तयार केलेले तीन कृषी कायदे वापस घ्यावेत याशिवाय बेळगाव येथील जय किसान होलसेल भाजी मार्केट ला दिलेली परवानगी रद्द करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
मंगळवार बारा एप्रिल रोजी मैसूर मध्ये ‘शेतकरी विश्वासघात सप्ताहाचे’ उद्घाटन करुन सुरुवात करण्यात येणार आहे त्यानंतर तेरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयात असलेल्या ग्रामीणच्या आमदार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे याशिवाय शनिवारी 16 एप्रिल रोजी बेळगाव दक्षिणचे आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
संयुक्त किसान मोर्चा अंतर्गत 18 एप्रिल रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून या शेतकरी विश्वासघात सप्ताहाची सांगता करत विविध मागण्याची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे.