बेळगाव शहरातील महांतेशनगर येथे श्री बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाच्या विविध तत्त्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुभव मंडपाची उभारणी करण्यात येत आहे.
यासाठी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी विशेष परिश्रम घेतले असून हा अनुभव मंडप उभारण्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
श्री बसवेश्वर हे 12 व्या शतकातील भारतीय राजकारणी, तत्त्वज्ञानी, कवी, समाज सुधारक आणि लिंगायत संत होते. कल्याणी चालुक्य /कलचुरी राजवंशाच्या काळात त्यांनी शिवा केंद्रित भक्तीची चळवळ आणि हिंदू शैव समाज सुधारणा केली.
श्री बसवेश्वर यांनी ‘वचन’ नांवाने प्रसिद्ध असणाऱ्या या आपल्या काव्याद्वारे सामाजिक जनजागृती केली. समाजातील लिंग अथवा सामाजिक भेदभाव, अंधश्रद्धा आणि विधि यांना त्यांचा तीव्र विरोध होता.
त्यांनी लिंगायत समाजाला शिवलिंगाची प्रतिमा असणाऱ्या इष्टलिंग हाराची ओळख करून दिली. जे शिवभक्तीचे सतत स्मरण करून देत असते.