शनिवारी सायंकाळी बेळगावात झालेल्या वळीव पावसाच्या दणक्याने शहरातील रस्ते गटारी भरून वाहल्या होत्या. नेहमीप्रमाणे पाऊस झाला की येडुरप्पा मार्गावर पाणी साचते.मागील पावसा प्रमाणे त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी पुन्हा एकदा पाहायला मिळाली परिणामी काही वेळ एका बाजूनेच ट्राफिक सुरू होती आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
अनेकदा महापालिका प्रशासनाला विनंती करून देखील या मार्गाची ही समस्या सोडवण्यात प्रशासनाला मनपाला अपयश आले आहे. ज्या ज्या वेळी पाऊस येतो, कधी पावसाळ्यातला मोठा पाऊस येतो त्यावेळी ओल्ड पी बी रस्त्यावर पाणी हमखास येते हे चित्र आता कायमचेच बनले आहे.
शनिवारी झालेल्या वळीवाच्या जोरदार पावसाने देखील या गुडघाभर पाणी मार्गावर मोठ्या प्रमाणात आले होते त्याचा परिणाम म्हणून रहदारी एका बाजूने सुरू होती.
या रस्त्याला नाव माजी मुख्यमंत्र्याचे आहे मात्र मुख्यमंत्र्याच्या नावाला साजेसा रस्ता तयार करण्यात आलेला नाही त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी ड्रीनेजचे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचते त्यामुळे या राष्ट्यावरून ये जा करणाऱ्याना त्रास सहन करावा लागतो याकडे लक्ष देऊन त्वरित समस्या सुटावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.