Thursday, December 26, 2024

/

दुर्लक्षित अंगणवाडीची ‘यांनी’ केली रंगरंगोटी

 belgaum

बेळगाव शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि जीवन संघर्ष फौंडेशनतर्फे हब्बनहट्टी येथील दुर्लक्षित अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.

खानापूर तालुक्यातील जांबोटीनजीक दुर्गम भागात असणाऱ्या हब्बनहट्टी येथ या खेडेगावातील दुर्लक्षित अंगणवाडी शाळेला फेसबुक फ्रेंड्स सर्कल मार्फत अलीकडेच खुर्च्या, टेबल आणि खेळाचे साहित्य देणगीदाखल देण्यात आले होते.

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांची मित्र आशुतोष नाडकर्णी यांच्या आई श्रीमती आशा नाडकर्णी यांनी सदर 25 प्लास्टिक खुर्च्या, 40 लाकडी खुर्च्या, तीन टेबल, एक घसरगुंडी आणि एक राउंड व्हील देणगीदाखल दिले आहे. त्यावेळी दरेकर यांनी सदर अंगणवाडीचा फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून आणखी विकास साधण्याचे आश्वासन दिले होते.Anganwadi

सदर आश्वासनाची पूर्तता करताना काल रविवारी सदर अंगणवाडीची रंगरंगोटी करून देण्यात आली. यासाठी डॉ. रोहित जोशी, विनायक एल. आणि श्रीनाथ देशपांडे यांनी रंग उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे यल्लाप्पा पाटील आणि पवन पाटील यांनी सलग तीन दिवस हिंडलगा -सुळगा येथून हब्बनहट्टी येथे जाऊन अंगणवाडीचे रंगकाम पूर्ण केले. या उपक्रमासाठी जीवन संघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणपत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या सर्वांचे संतोष दरेकर यांनी खास आभार मानले आहेत.

याप्रसंगी गुरुवर्य माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, डॉ. गणपत पाटील, सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, नागोजी गावडे, गोविंद गावडे, अर्जुन गावडे, संजय गावडे, नानू घाडी, मारुती गावडे, पांडुरंग गावडे, परशुराम गावडे, संजय गावडे, धनाजी गावडे आदी हब्बनहट्टी ग्रामस्थ उपस्थित होते. बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे गावातील अंगणवाडीची या पद्धतीने सुधारणा केली जात असल्याबद्दल हब्बनहट्टी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.