आगामी जून महिन्यात कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या शक्यतेवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वक्तव्य केले आहे.पंतप्रधानांसोबत बैठक झाल्यावर 27 एप्रिल नंतर कर्नाटकातले नवीन कोविड प्रोटोकॉल जाहीर करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे ते पत्रकारांशी बोलत होते.
या अगोदर आरोग्यमंत्री डी सुधाकर यांनी नवीन कोविड नियमावली जाहीर केली आहे मात्र सुधारित नियमांवलीसाठी आपण पंतप्रधानांसोबत बैठक करणार आहोत आहोत त्यानंतरच म्हणजे 27 एप्रिल नंतर नवीन प्रकारची कोविड नियमावली जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सुधारित नियमावली लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे आगामी जूनमहिन्यात कोरोनाचे चौथी लाट देशात येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे
त्याचा सामना करण्यासाठी सगळी राज्ये तयारीत आहेत अश्या वेळी कर्नाटकात नवीन कोविड नियमावली कधी जाहीर होणार याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिलं होते.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपण 27 तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर कर्नाटकातील कोविड नियमावली जारी करू म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य ट्विटर वरील लिंक मध्ये पहा
#TNIE Though Health Minister @mla_sudhakar has already given instruction on the Covid situation, fresh protocol will be issued after attending chief ministers' meeting called by Prime Minister @narendramodi on April 27, CM @BSBommai. @XpressBengaluru @Cloudnirad @ramupatil_TNIE pic.twitter.com/CCbzqC8dGJ
— Pramodkumar Vaidya (@pramodvaidya06) April 24, 2022