स्टार एअर कंपनीने बेळगाव ते नागपूर हे नवे विमान आजपासून सुरू केले या नव्या विमानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे एक छोटेखानी कार्यक्रम करून नव्या विमानाची सेवा सुरू करण्यात आली आहे.
विमानतळावर स्टारएअरने आयोजित छोटा कार्यक्रम आकर्षण ठरला.रिबन कटिंग, दिवाबत्ती आणि केक कटिंग करण्यात आले. एअरपोर्ट डायरेक्टर राजेशकुमार मौर्य यांच्या उपस्थितीत या सेवेला सुरुवात झाली.
प्रथम प्रवासी:कु.अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. अनिल कुलकर्णी, मिरज यांना फुल देऊन स्वागत केलं. पी. एस. देसाई, टर्मिनल हेड /सीएनएस प्रभारी, रेड्डी: टर्मिनल व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी: एएआय, इराप्पा वली शशिकांत, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक किरण: वरिष्ठ व्यवस्थापक, रकीब, स्टेशन मॅनेजर: स्टारएअर, स्टेशन हेड; : एचपीसीएल आणि इतर उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते.उडान ३ अंतर्गत बहुप्रतीक्षित क्षेत्र सुरू केल्याबद्दल विमानतळ संचालकांनी स्टारएअरचे अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले.
सुरत, अहमदाबाद, जोधपूर, मुंबई, नाशिक, इंदूर आणि तिरुपती नंतर आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि शनिवार स्टार एअरचे हे आठवे शहर कनेक्शन आहे.नागपूरचे विमान सकाळी बेळगाव येथून ८.३० वाजता सुटून सकाळी १०.०० वाजता पोचेल आणि नागपूरहून सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुपारी १२.०० वाजता आगमन होईल.हा दीड तासांचा आरामदायी प्रवास आहे.
स्टारएअरने जयपूर वगळता सर्व आरसीएस मार्ग सुरू केले.
प्रवाशांच्या स्वागतासाठी व्हिजनफ्लाय इन्स्टिट्यूट अँड अॅपटेक एव्हिएशन, येथील विद्यार्थ्यांनी बनवलेली सुंदर रांगोळी लक्ष वेधून घेत होती.
विमानतळावरील अॅपटेक एव्हिएशन, येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुंदर स्वागत नृत्य आणि रॅम्प वॉक आकर्षण ठरले.नागपूर विमानाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशीच चांगला प्रतिसाद, आगमन पॅसेंजर ४६ आणि प्रस्थान प्रवासी ५० होते. एकूण आसनक्षमता ५० आहे.