अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत कालपासून सुरू असलेल्या बेळगावातील भाजप कोअर कमिटीमध्ये चर्चा झाली असून कत्तींच्या त्या जिल्हा विभाजनाच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
कत्ती यांच्या वक्तव्यानंतर गोकाक आणि बैलहोंगल मध्ये विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलने झाली सुरू झाली आहेत आणि यावर जिल्ह्यामध्ये विभाजनावर वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.
कत्ती यांनी बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन करत चिकोडी आणि बैलहोंगल असे दोन नवीन जिल्हे करावे अशी मागणी केली होती आणि त्यासाठी मुख्यमंत्री बोममई यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार असे म्हटले होते.
बेळगावात सुरू असलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देखील कत्ती यांच्या जिल्हा विभाजनाच्या वक्तव्याबद्दल चर्चा करण्यात आली.बैठकीत काहीनी आक्षेप उत्तर काही जणांनी समर्थन केले विशेष म्हणजे राज्यसभा सदस्य ईरांणणा कडाडी यांनी कत्ती यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
माध्यमांशी बोलताना इराणणा कडाडी यांनी या गोष्टीला दुजोरा देत जिल्हा विभाजन बद्दल चर्चा झाल्याचे सांगितले. उमेश कत्ती यांचं हे वक्तव्य वैयक्तिक आहे कुणालाही वैयक्तिक मत मांडायला अधिकार आहे त्यांनी ते मांडू शकतात मात्र राज्य सरकार सर्वांशी विचार विनिमय करून भौगोलिक दृष्टीकोनातून विचार करून निर्णय घेत असते असे सांगत त्यांनी गोकाक नवीन जिल्हा झाला पाहिजे अशी मागणी केली.