बेळगाव चे मध्यवर्ती आणि सीबीटी बस स्थानक परिसरात केवळ प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड असणार आहे. सर्व रिक्षांनी प्रि पेड स्टॅंड मध्येच नंबर लावावा कोणत्याही खाजगी ऑटो स्टँडला इथे परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्टीकरण उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला.
सोमवारी सकाळी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, उत्तरचे रहदारी पोलीस निरीक्षक आणि कँटोन्मेंट अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसराची पाहणी केली.
बस स्थानक परिसरामध्ये भाजी विकणाऱ्या महिला ऑटो स्थानकांच्या समस्या जाणून घेतल्या. जवळपास 60 कोटी खर्च करून मध्यवर्ती आणि सी बी टी बस स्टॅन्ड होणार आहेत त्याठिकाणी बेळगावला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाईल असं बेनके यांनी यावेळी नमूद केलं.
बस स्थानक परिसरामध्ये तीन रिक्षा स्टँड आहेत तिन्ही रिक्षा स्टॅन्ड काढली जातील आणि बसस्थानक परिसरात केवळ प्रीपेड रिक्षा सुरु होईल अनिल बेनके यांनी सांगितले.
आगामी सहा महिन्यांमध्ये बेळगावच्या नूतन बसस्थानकाचा उदघाटन करण्यात येईल लवकरात लवकर बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील करू असेही बेनके म्हणाले .भाजीविक्रेते रस्त्यावर बसून विकणाऱ्या बद्दल विचारले असता कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजी विक्री किंवा इतरांची काय पर्यायी व्यवस्था करता येईल त्याबद्दलही आपण विचार करू असेही ते म्हणाले.