Tuesday, September 17, 2024

/

सांबरा येथे रविवारी भव्य कुस्ती मैदान

 belgaum

सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

विमानतळ लगतच्या मैदानावर आखाडा बनवण्यात आला आहे. कुस्ती शौकिनांसाठी बसण्याची तसेच पार्किंगची सोय करण्यात आली आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी प्रवीण कुमार हरियाणा विरुध्द कुर्डुवाडी आखाड्याचा दादा मुलाणी यांच्यात होणार आहे.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार वि. मोतीबाग तालीम कोल्हापूरचा अरुण भोंगार्डे, तिसऱ्या क्रमांकाची लढत शाहुपुरी तालमी कोल्हापूरचा अमोल बागव वि शिवराय आखाडा कुर्डुवाडीचा शुभम मुसळे यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित कंग्राळी वि पवन चिकदिनकोप, पाचव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी वि सुनील कवठेपिरान, सहाव्या क्रमांकाची कुस्ती निरंजन येळ्ळूर वि अजिंक्य सांगली,Kusti

सातव्या क्रमांकाची कुस्ती महादेव दऱ्यांन्नवर वि प्रेमनाथ कंग्राळी, आठव्या क्रमांकाची कुस्ती प्रवीण निलजी वि रणजित सांगली, नवव्या क्रमांकाची कुस्ती पंकज चापगाव वि संकल्प कंग्राळी दहाव्या क्रमांकाची कुस्ती ओमकार सावगाव वि गणेश कडोली यांच्यात होणार आहे. त्याचप्रमाणे कुबेर पिरनवाडी वि शुभम कंग्राळी, महेश तिर्थकुंडे वि राहुल किणये, वैभव सांबरा वि रोहित माचीगड, किसन कंग्राळी वि रोहन कडोली, ओमकार मुतगा वि राहूल माचीगड यांच्यात आकर्षक कुस्त्या होणार आहेत.

मैदान यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे, मुकुंद मुतगेकर, शिवाजी जत्राटी, इराप्पा जोई, लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, भुजंग धर्मोजी, मोहन हरजी, यल्लाप्पा जोगानी, सिद्राई जाधव, शिवाजी मालाई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, नितीन चिंगळी, महेंद्र गोठे, यल्लाप्पा हरजी, अप्पानी यड्डी, नागेश गिरमल, परशराम लोहार, तिप्पांना हणमाई, प्रवीण ताडे ,भुजंग धर्मोजी, परशराम धर्मोजी आणि गावकरी परिश्रम घेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.