बेळगाव शहर परिसरातील चिकन मटण दुकानां समोर करी निमित्त खवय्यांच्या रांगा लागलेल्या आहेत.डबे पिशव्या घेऊन खवय्ये आपल्या घरच्याच कपड्यावर मटण दुकाना बाहेर पहाटे पासून उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.मांडीचे लुसलुसीत,काळजाचा तुकडा आणि नळीची पुंगळी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी खाटीकाचे जुने संबंध कामास येत आहेत.
रंग खेळून दमलेल्या गृहिणी मसाला वाटण्यात दंग आहेत काही ठिकाणीचा चुलीवरचा कोंबडा गल्लीत दरवळत आहेत,खवय्यांची रसना तिखट रस्याच्या आठवणीने सकाळी पासूनच पणावलेली आहे एकदंर बेळगाव शहर परिसराचा मूड होळी आणि नळीच्यात दंग आहे.हजारो किलो मटण आणि चिकनची विक्रमी विक्री शुक्रवारी झालेली आहे दुपारी बारा वाजले तरी मटण दुकाना समोरील रांगा कमी व्हायला तयार नाहीत.
ग्रामीण भागातील विशेषतः काही ठिकाणी खवय्यांनी बजेटचा विचार करत अख्खा ठगरचं आणला आहे त्याचे वाटे करून पूर्ण गल्ली तृप्तीची ढेकर देण्याच्या नादात आहेत.काही गृहिणीनी पाक कलेचे कौशल्य दाखवत चिकनचे विविध स्नॅक्स तोंडी लावणी तयार करणे चालू आहे.
काही रसिक खवय्या गल्लीतून फिरत जाऊन नुसता वासानीच तृप्ती मिळवत आहेत घरोघरी शिजवल्या जाणाऱ्या आणि गृहिणींच्या पाक कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या या होळीच्या किमयेने मात्र रसिकांची चांगली चंगळ झाली आहे.
आजूबाजूच्या खेड्यापड्यात देखील धुळवडीची धमाल चालूच आहे कुठं फेर,तर चिकन तंदूर लेग पिस तर कुठे मुंडी पाया तर कुठे मटण चॉप्सची मेहफिली बसल्या आहेत एकूण शुक्रवारीचा दिवस हा मटणी वार म्हणून बेळगाव कर जनतेत प्रसिद्ध झाला आहे.
‘कालच्या पोळीवर आजच्या नळीचा उतारा’अशीच चर्चा सर्वत्र रंगत आहे.