Tuesday, May 7, 2024

/

पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

 belgaum

बेळगाव तालुक्यातील सुळगा येथील जनता कॉलनीजवळ असलेल्या क्वारीनजीकच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोमवारी दुपारी हि घटना घडली असून पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी सुळगा या गावातील आंबेडकर गल्ली येथील १५ वर्षीय कुमार अशोक कांबळे याचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. पीएसआय गुरुनाथ, पीएसआय मंजुनाथ हुलकुंड, प्रकाश बल्लाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.