belgaum

येळ्ळूर ग्रामपंचायतीचे पीडिओ अरुण नाईक त्यांचे काम उत्तम असून त्यांना ग्रामपंचायतीमध्ये पूर्णवेळ कायम करा, अशी मागणी येळ्ळूर ग्रा. पं. सदस्यांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

bg

येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश दवाडकर यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.

येळ्ळूर ग्रामपंचायत पीडिओ अरुण नाईक हे गेल्या दोन -तीन वर्षांपासून उत्तम कार्य करत आहेत. यासाठी नाईक यांना पुर्णवेळ येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये कायम करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.Yellur gp

निवेदन सादर करतेवेळी येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, परशुराम परीट, रमेश मेणसे, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, राजू डोंन्यांनावर, पिंटू चौगुले, कल्लापा मेलगे, राजकुमार पावले, सदस्या रूपा पुण्यनावर, रुक्मिणी नाईक, मनीषा घाडी, सोनाली येळ्ळूरकर, शांता काकतकर, रेणुका मेलगे, शांता मासेकर,वनिता परीट, शालन पाटील आणि लक्ष्मी कणबरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.