बेळगावात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही काळ वातावरणात गारवा पसरला होता.गुरुवारी दुपारी देखील आकाश भरून आले होते आणि सायंकाळी पाऊस जोरात येणार असच वातावरण होते.पण सायंकाळी पावसाचे काही थेंब पडले आणि आकाश निरभ्र झाले.
शुक्रवारी सायंकाळी मात्र अवकाळी पावसाने काही वेळ हजेरी लावली.या अवकाळी पावसामुळे जनजीवनावर काही काळ परिणाम झाला.
पावसामुळे वातावरण थंड झाले.पाऊस थांबल्या नंतर मात्र काही वेळाने उष्मा वाढला.अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तापमान वाढेल तसे अवकाळी पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी कुंणकुंबी येथे जोरदार पावसाच्या सरी पडल्या होत्या या शिवाय शुक्रवारी सायंकाळी हिंडलगा परिसरात देखील पावसाच्या सरी पडल्या त्यामुळे हवामानात बदल झाला होता.