Friday, December 20, 2024

/

मास्क वगळता सर्व निर्बंध 31 मार्चपासून मागे

 belgaum

कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात सातत्याने होणारी घट लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनाचा उद्रेक होऊन देश लाॅक डाऊनमध्ये गेल्यानंतर लागू करण्यात आलेले कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध येत्या 31 मार्च 2022 पासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि फेस मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर हे नियम कायम असतील.

बेळगाव जिल्ह्यात काल बुधवारी 17 सक्रिय रुग्ण होते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे 1001 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत सुमारे 1,00,121 इतके रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोन वर्षाच्या कालावधीत एकुण 19,64,840 स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी कोरोना संसर्गाचे स्वरूप पाहता लोकांनी अजूनही परिस्थितीबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गमध्ये कोणतीही वाढ झाल्यास राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक पातळीवर त्वरित आणि सक्रीय कारवाई करू शकतात. तसेच याबाबत आरोग्य मंत्रालय देखील वेळोवेळी सूचना जारी करेल असे स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारने सर्वप्रथम 24-3-2020 रोजी देशात निर्बंध लागू केले होते. त्यानंतर परिस्थितीनुसार वेळोवेळी यामध्ये सुधारणा करण्यात आली होती. यशस्वी लसीकरण मोहीमेनंतर देशात कोरोना संसर्गात घट झाली आहे.

त्यामुळे बहुतांश निर्बंध 31 मार्च 2022 रोजी संपतील. तरीही सार्वजनिक ठिकाणी मास्के घालणे आवश्यक असेल. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे

. तसेच राज्यांशी पत्ररुपी संवाद साधला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल 2 वर्षांनी देशातील जनता निर्बंध मुक्त जीवन जगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.