Sunday, May 19, 2024

/

‘आधी महाराजांना अभिवादन मग काश्मीर फाइल्स सिनेमा’

 belgaum

धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास निमित्त बेळगाव जिल्ह्यातील 100 हून अधिक स्वामीजींनी बेळगाव शहरातल्या धर्मवीर संभाजी चौकात संभाजी महाराजांना अभिवादन केलं आणि त्यानंतर न्यूक्लियस मॉल सिनेमा घरात जाऊन द काश्मीर फाइल्स हा सिनेमा बघितला.

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यासोबत बेळगाव जिल्ह्यातल्या 100 हून अधिक स्वामीजींनी बलिदान मासा निमित्त संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले संभाजी महाराजांना अभिवादन केले त्यानंतर न्यूक्लियस मॉलला जात कश्मीर फाइल्स हा सिनेमाचा लाभ घेतला.

बलिदान मासाच्या एकविसाव्या दिवशी बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांच्या वतीने ध. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमात शेकडो स्वामीजींनी देखील सहभाग घेतला होता.Svamiji watching movie

 belgaum

आजच्या युगात युवकांत धर्मरक्षण आणि त्याग भावना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून बलिदान मासचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना स्वामीजी यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन संघर्षाची आणि हिंदू धर्मासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली त्यानुसार आज सर्व धर्म भक्त देशभक्त समाज बलिदान मासा निमित्त संभाजी महाराजांना अभिवादन केल्याचे स्वामीजींनी सांगितले

उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यासोबत कित्तूर कलमठ,राजयोगेंद्र स्वामीजी, गदग शिवानंद मठाचे स्वामीजी सदाशिवानंद स्वामीजी,मुरगोडचे नीलकंठ महास्वामीजीं,बेळगावचे रुद्र केशव स्वामीजी,कडोली दुरंडेश्वर मठाचे स्वामीजी यावेळी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.