Sunday, July 14, 2024

/

‘शिवजयंती’ राष्ट्रीय सण म्हणून बेळगावात साजरी झाली पाहिजे – किरण जाधव

 belgaum

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात तिथीप्रमाणे जन्मसोहळा साजरा झाला. सकल मराठा समाज्याचे किरण जाधव,रमाकांत कोंडसकर, सुनील जाधव,रणजित पाटील,दता जाधव, जयराज हलगेकर,सागर पाटील,महादेव पाटील, शिवाजी उद्यानात शिवरायांच्या जन्मसोहळ्याला उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवाजी उद्यानाला फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

मराठा समाजाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा हा उत्सव केवळ बेळगावपूरताच मर्यादीत राहिलेला नाही तर परराज्यात जगभरात साजरा केला जातो. यंदा कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाल्याने स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.असे मत जयराज हलगेकर यांनी मांडले

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि रयतेचे स्वराज्य निर्माण केलं. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठास सुद्धा त्याकाळी संरक्षण केलं होतं. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातील ‘शिवराज्य’ निर्माण करण्यासाठी शिवरायांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. प्रत्येक कष्टकऱ्यांना त्याच्या हाताला काम देऊन उत्तम मोबदला त्याकाळी मिळत होता.शेतकऱ्यांना पेन्शन देणारा या देशातील सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.’ त्यामुळे प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे… असे मत मराठा समाज्याचे नेते किरण जाधव यांनी व्यक्त केले.

शिवजयंती साजरी करताना आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे, त्यांचे विचार कसे आत्मसात करू शकतो, शिवरायांच्या स्वराज्यातून आपण काय घ्यायला हवे हे पाहण्याची गरज आहे, असे रमाकांत कोंडसकर म्हणाले.Maratha samaj

मराठा समाजाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा हा उत्सव केवळ बेळगावपूरताच मर्यादीत राहिलेला नाही तर परराज्यात जगभरात साजरा केला जातो. यंदा कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाल्याने स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.असे मत सुनिल जाधव यांनी मांडले

यावेळी उपस्थित दत्ता जाधव, सागर पाटील, महादेव पाटील, रणजित पाटील,विशाल कंग्रळकर, यासह अन्य शिवभक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.