Friday, May 3, 2024

/

‘गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे’ -राज्यद्रोह हटवण्यावर कानडी संघटना

 belgaum

शिवराय अवमान विरोधी आंदोलनात 47 दिवस कारागृह सोसलेल्या त्या शिवभक्तावरील आय पी सी 124 अ अर्थात राजद्रोहाचा गुन्हा कमी केल्या बद्दल कानडी संघटनांनी पुन्हा एकदा कुलहेकुई सुरू केली आहे.

डिसेंबर महिन्यात बेळगावात शिवभक्ता वर 124 राजगुरू हा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र दोषारोपपत्रात सदर गुन्हा पोलिसांनी कमीही केला होता त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या कानडी संघटनांनी पुन्हा कोल्हेकुई सुरू केली असून थेट गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.

एकदा दाखल केलेला तो राजद्रोहाचा गुन्हा का काढला याचे स्पष्टीकरण बेळगावातील कन्नड जनतेला द्यावे असा प्रश्न गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना अशोक चंदरगी यांनी विचारला आहे.वास्तविक पाहता सुरुवातीला कोणताही आधार नसताना राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता मात्र न्यायालयात पोलिसांनी हरकत दाखल करताना पोलिसांनी राजद्रोहाचे कलम कमी केले होते.त्यामुळे भ्रम निरास झालेल्या कानडी संघटनांनी पुन्हा एकदा हा विषय उकरून काढला आहे.

 belgaum

बेळगावातील मराठी भाषिकांवर या ना त्या कारणाने कानडी संघटना अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करत असतात त्यामुळे तणाव वाढत असतो आता या राजद्रोहाचा गुन्हा कमी केलेल्या बाबीला काही महिने उलटले असताना पुन्हा हा मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिवराय अवामान विरोधी आंदोलनात सहभागी असलेले बेळगाव मधील 38 शिव भक्त जवळपास 47 दिवस तुरुंगात होते त्यानंतर त्यांना 47 दिवसांनी जामीन मंजूर झाला होता आता या खटल्यातील नियमित तारखा सुरू आहेत तर दुसरीकडे कानडी संघटना पुन्हा या मुद्द्यावर सरकारवर दबाव आणू पहात आहे.

बेळगावातील कन्नड नेते अशोक चंदरगी यांनी बुधवारी कानडी माध्यमांना प्रतिक्रिया देत गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना जाब विचारला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.