Thursday, May 30, 2024

/

*ज्यु. रोहिणी पाटीलची खेलो इंडिया साठी निवड*

 belgaum

खानापूर तालुक्यातील गर्लगुंजीची गावची कन्या रोहिणी पाटील आगामी काळात होणाऱ्या बेंगलोर येथे खेलो इंडिया साठी ज्युडो या स्पर्धेत भाग घेणार आहे.

नुकत्याच उत्तर प्रदेश कानपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालय स्पर्धेत बेळगावच्या रोहिणी पाटील हिने उत्तम रीतीने प्रतिस्पर्ध्याची मात करत चार सामन्यात उत्तम कामगिरी करत आपले वर्चस्व टिकवून ठेवले यामधून तिची आगामी काळात होणाऱ्या खेलो इंडिया साठी निवड झाली.Rohini patil

रोहिणी पाटील ही गर्लगुंजीची खेळाडू असून हिने 2014 पासून ज्युडो या खेळ प्रकारात भाग घेऊन आज पर्यंत राष्ट्रीय स्तरावर एक रौप्य ,चार कास्यपदक,पटकाविले आहे तर राज्यस्तरीय स्पर्धात बारा सुवर्णपदकाची आज पर्यंत गवसणी घातली आहे.

 belgaum

रोहिणी हिला जितेंद्रसिंग,त्रिवेणीसिंग यांचे मार्गदर्शन लाभत असून सध्या ज्यूडो कोच रोहिणी पाटील यांच्याकडून जिल्हा क्रीडांगणावर प्रशिक्षण घेत आहे.

खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरील मोठी स्पर्धा आहे ज्यात बेळगावच्या अनेक खेळाडूंनी यश मिळवले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.