इंडो -जापनीज सैनिकांमधील सामंजस्य स्तुत्य : मेजर जनरल भावनिष कुमार

0
3
Indo japan
 belgaum

भाषेचा अडथळा असतानादेखील भारतीय सैनिक आणि जपानी सैनिकांमधील परस्पर सामंजस्य अत्यंत वाखाणण्याजोगे असल्यामुळेच ‘एक्स धर्मा गार्डियन -2022’ ही इंडो -जापनीज लष्करी कवायत यशस्वी होण्यास मदत झाली, असे प्रशंसोद्गार मेजर जनरल भावनीष कुमार यांनी काढले.

‘एक्स धर्म गार्डियन -2022’ संयुक्त लष्करी कवायती अंतर्गत शस्त्रसज्ज भारत व जपानी सैनिकांनी आज बुधवारी दहशतवाद्यांच्या तावडीतून ओलिसांच्या सुटकेची म्हणजे रेस्क्यू ऑपरेशनची प्रात्यक्षिके सादर केली.

या प्रात्यक्षिकांच्या रोहिडेश्वर कॅम्प येथील सांगता समारंभाप्रसंगी मेजर जनरल भावनीष कुमार बोलत होते. दोन्ही देशाच्या सैनिकांच्या तुकड्यांमधील कौशल्य आणि नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा शक्ती यांची कुमार यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.Indo japan

 belgaum

या कार्यक्रमात भारत आणि जपानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव कथन करून समयोचित विचार व्यक्त केले.

तसेच त्यांनी परस्परांच्या युद्धकौशल्याची प्रशंसाही केली. यावेळी एक्स धर्मा गार्डियन-2022 संयुक्त कवायतीत सहभागी भारत व जपानच्या सैनिकांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सामूहिक छायाचित्र करण्याचा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.