गेली दोन वर्षे कोरोना मुळे धुलिवंदन रंग उधळण म्हणावी तेवढी उत्साहाने साजरी करण्यात आली नव्हती मात्र यावर्षी शहरातील गल्लोगल्लीत चौकात गावा गावात डॉल्बी लाऊन उत्साहाने रंग उधळण करत मागील दोन वर्षाची कसर यावर्षी रंगोत्सवात दिसून आली.
बेळगाव शहर आणि परिसर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीलाच रंगपंचमी साजरी करतो. हा उत्सव शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. महिला युवक लहान मुले आणि वृद्धांनीही हा सण रंगाची उधळण करून साजरा केला. अनेक ठिकाणी प्रंचड गर्दीत धुळवड साजरी करण्यात आली.
सकाळपासून ते दुपारी दिड दोन पर्यंत रंगांचा हा सण सुरु होता, मोटारसायकली वरून दाखल होणारे तरुण आणि ठिकठिकाणी फवारे लावून नृत्य करणारे तरुण दिसून आले, त्यांचा उत्सव जोरदार होता.
शहरातील चव्हाट गल्ली आणि खडक गल्ली मध्ये डॉल्बीच्या तालावर हजारो युवक थिरकातानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरास लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती परंपरे प्रमाणे पांगुळ गल्लीत दुपारी लोटांगण पार पडले.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी परंपरेप्रमाणे होलिकोत्सव साजरा करण्यात आला विशेष करून बेळगाव तालुक्यातल्या गुंजेनहट्टी येथे होळी कामाची यात्रा उत्साहात पार पडली हजारो भाविक या वार्षिक यात्रेत सहभागी झाले होते त्यानंतर हंगरगा गावात होळीनिमित्त कोंबडे उडवण्याची प्रथा आहे तो उत्साहात साजरा करण्यात आला त्या शिवाय कर्ले येथील आगळी वेगळी होळी आयोजित करण्यात आली होती एकुणच ग्रामीण भागामध्ये शहरा प्रमाणे होलिकोत्सव मोठ्या उत्साहाने धार्मिक भावाने साजरा करण्यात आला.