belgaum

बेळगावात बँक कर्मचाऱ्यांचा संप; धर्मवीर संभाजी महाराज चौकात आंदोलन

0
569
 belgaum

बेळगाव लाईव्ह विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील विविध बँकांचे कर्मचारी आज संपावर उतरले असून त्याचे पडसाद बेळगावातही उमटले.


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बेळगावातील बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.


पाच दिवसांचा कामकाज आठवडा लागू करणे, वेतन व सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करणे, कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण कमी करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

 belgaum


या आंदोलनात विविध राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी सरकार व बँक प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली.


संपामुळे आज बेळगावातील अनेक बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला असून ग्राहकांना विविध बँकिंग सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.